Tuesday, 6 January 2015


मनमयुरा !!



मनमयुरा का फुलविसी तू पिसारा!
कैसे दाटुनी आले  मेघ नभा!
पाऊसाची लागली का रे आस तुला!
तहानलेला हा जीव व्याकुळला!

होईल का रे मेघ गर्जना?
रिमझिम बरसतील का रे पाऊसधारा?
होईल का माझा श्वास मोकळा?
तुझ्याच वाटेवरी जीव आतुरला?

कळतील का मेघास माझ्या भावना!
आता सुरु झालाय ऋतू नवा!
जडला गेलाय छंद आगळा!
होतील का पूर्ण साऱ्या मनोकामना?


- बिल्वा पाटणकर


No comments:

Post a Comment